धाराशिव (प्रतिनिधी)- एखाद प्रकरण आपल्या अंगाशी येत आहे याचा अंदाज आला की राणा पाटील त्या विषयाला बगल देत पळ काढतात. असा चिमटा शिवसेना जिल्हा प्रवक्ते तानाजी जाधवर यांनी काढला. भाजपने देखील एसआयटीची मागणी करावी जेणेकरून यात कोणाचे हितसंबंध आहेत हे समोर येईल. 

यावेळी जाधवर म्हणाले, भाजपच्या प्रवक्त्याद्वारे राणा पाटील जे बोलले ते सत्य शोधायला तुमच्या यंत्रणेकडून खूप लवकर सोक्षमोक्ष काढता येईल. कारण तुमची सत्ता अगदी दिल्ली पासून गल्लीपर्यंत आहे. त्यामुळे भाजपने या प्रकरणी कोणत्याही चौकशीची मागणी करावी असं थेट आव्हान जाधवर यांनी राणा पाटील यांना दिले. कोणता गुत्तेदार कोणाचा लाडका हे तुम्ही वीस महिने प्रक्रिया प्रलंबित ठेवून दाखवून दिलेच आहे. आमचा अजूनही तोच प्रश्न आहे की तुम्ही यासाठी वीस महिने कामे का होऊ दिली नाहीत.विषय भरकवटण्यासाठी राणा पाटील जाणीवपूर्वक विषयातंर करत आहेत. पण तुमचं सत्य जनतेसमोर आलं आहे शिवाय या अगोदर सुद्धा स्वतः च्या आर्थिक हितसंबंध जोपसण्यासाठीच त्यांनी जिल्हा नियोजन समितीच्या कामाना सुद्धा स्थगिती आणली होती. त्यामुळे आर्थिक लाभ होत नसेल तर कामात खोडा घालणे हे राणा पाटील यांचं नित्याच झालं आहे असं लोकांनीही गृहीत धरलं आहे. त्यामुळे विकास कोणाचा करायचा आहे हे सुद्धा लोकांना कळून चुकल्याच मत तानाजी जाधवर यांनी व्यक्त केलं आहे.

 
Top