तेर (प्रतिनिधी)- धाराशिव तालुक्यातील तेर येथे धनगर समाजाच्या वतीने विविध मागण्यासाठी शेळ्या मेंढ्यासह रास्तारोको आंदोलन करण्यात आले.
तेर येथील चौकामध्ये धनगर समाजाच्या वतीने धनगर समाजाचा अनुसूचित (एसटी) प्रवर्गात समावेश करावा व धनगर समाजाच्या अनुसूचित (एसटी) अंमलबजावणी आरक्षणासाठी जालना येथे आमरण उपोषणाला बसलेले दिपक बो-हाडे यांच्या समर्थनार्थ शेळ्या मेंढ्यासह रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.धनगर समाज बांधवांनी पेठ भागातून अकरावरील चौकापर्यंत हलगिच्या निनादात वाजत गाजत येऊन शेळ्या मेंढ्यासह रास्ता रोको आंदोलन केले.रास्ता रोको आंदोलनामुळे वाहातूक बराच वेळ ठप्प झाली होती.धनगर समाजाच्या वतीने ग्राम महसूल मंडळ अधिकारी शरद पवार,तेरचे ग्राम महसूल अधिकारी प्रशांत देशमुख यांना निवेदन देण्यात आल्यानंतर रास्ता रोको आंदोलन स्थगित करण्यात आले.