वाशी (प्रतिनिधी)- तालुक्यातील जि.प.पारडी शाळेत कौशल्य संपादनातून सृजनशीलतेचा विकास उपक्रम राबवण्यात आला.  शनिवारी(दि.5)  कौशल्य दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी पर्यावरणूक साहित्यातून   म्हणजे पाने फुले,तृण पाते यांचा वापर करून विविध प्रकारच्या कलाकृती साकारल्या.

 शासन निर्णयानुसार प्रत्येक शनिवारी विद्यार्थ्यांनी आपल्या कला कौशल्यामधे वाढ करून केवळ घोका आणि परीक्षेत ओका याहि पुढे जाऊन एक सृजनशील,कौशल्य संपन्न नागरिक व्हावे. कौशल्य संपादन करताना पर्यावरण संरक्षणाचे भान ठेवून परिसरात सहज  उपलब्ध सामुग्रीचा वापर करावा व आनंदाने सृजनशील व्हावे याकरीता उर्मिला भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी शाळेच्या आवारात असलेल्या विविध प्रकारच्या पानाफुलांचा वापर करून विवीध पक्षी, किटक, नक्षीकाम, रांगोळी साकारले व साकारलेल्या चित्रांबद्दल माहिती सांगितली.

यामुळे शून्य खर्चात नवनिर्मितीचा आनंद तर मिळालाच पण याबरोबरच निसर्गातील सजीवसृष्टी कशी एकमेकांवर अवलंबून आहे याची जाणीव झाली.पर्यावरणातील परीसंस्था बद्दल माहिती मिळाली व ती टिकून राहण्यासाठी आपण  जागृकपणे वर्तन केले पाहिजे हा विचार मनात दृढ होण्यास मदत झाली. विद्यार्थी आपनण केलेल्या कलाकृती पुन्हा पुन्हा वेगवेगळ्या दृष्टिकोनातून मधून न्याहळत मनोमन आनंदी होत होते. हा स्वनिर्मितीचा आनंद त्यांच्या मुखपटलावर लपून राहिला नाही. यासाठी शाळेतील शिक्षक बापूराव कात्रे,वैभव सोनवने,शिवराज घुले,राणी येवले,गंगासागर आखाडे यांचे सहकार्य लाभले.

सर्व कलाकृती, सर्जनशीलता पाहून शाळेचे मुख्याध्यापकआत्माराम नागटिळक यांनी बालकांचे कौतुक करत सृजनशीलतेला प्रोत्साहन दिले.


 
Top