तेर (प्रतिनिधी)- धाराशिव तालुक्यातील तेर येथे पूरग्रस्त कुटुंबांना बायफ तर्फे रेशन कीटचे व पशुपालकांना जनावरांसाठी खनिज मिश्रचे पुडे वाटप करण्यात आले.

धाराशिव तालुक्यातील तेर येथे बायफ तर्फे 26 पूरग्रस्तांना रेशन कीटचे वाटत तर 100 पशुपालकांना जनावरांसाठी खनिज मिश्रचे वाटत पशुसंवर्धनचे जिल्हा उपायुक्त डॉ.मनोज घाटे, सहाय्यक जिल्हा उपायुक्त डॉ.मुकूंद तावरे,बायफ चे प्रकल्प समन्वयक डॉ.अतुल मुळे, वरीष्ठ प्रकल्प अधिकारी नुतन क्षिरसागर यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.यावेळी पशुधन विकास अधिकारी डॉ.दिपक क्षिरसागर, पशुधन पर्यवेक्षक डी.एन.कुंभार, गोरख माळी,राहुल गायकवाड, सुनिल गायकवाड, नरहरी बडवे आदी उपस्थिती होती.

 
Top