उमरगा (प्रतिनिधी)-  उमरगा-येथील नामांकित डॉ. के. डी. शेंडगे चॅरिटेबल ट्रस्ट अंतर्गत नवरात्र उत्सवानिमित्त 26 ते 28 सप्टेंबर दरम्यान दांडिया व गरबा नृत्याचे आयोजन करण्यात आले होते.

नवरात्र महोत्सव हा शक्तीची उपासना आणि सामाजिक राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतिक असलेला उत्सव असून शेंडगे इंग्लिश स्कूलच्या वतीने आज उमरगेकरांचा उत्स्फूर्त सहभाग पाहून आनंद वाटला .याप्रसंगी अनेक मान्यवरांनी नवरात्र महोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या.  यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उमरगा पोलीस ठाण्याचे नूतन पोलीस निरीक्षक प्रल्हादराव सूर्यवंशी, पीएसआय भराटे, सौ सविता बिराजदार ,सौ स्मिता माने, सौ.स्नेहा माने, डॉक्टर सौ .सुहासिनी शेंडगे, डॉक्टर सौ. सारिका बेडदुर्गे, तसेच संस्थेचे संचालक प्रा .गोरख घोडके, प्रा.अशोक दूधभाते, डी .बी. कुलकर्णी, स्टेट बोर्डाचे मुख्याध्याक गिरीष देशपांडे ,मुख्याध्यापिका सौ आशा चोकडा, नृत्यकला शिक्षक संतोष भस्मे, समन्वयक वर्षा चव्हाण, आदी उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.कार्यक्रमाचे संचलन व आभार डी. डी. जाधव यांनी मानले.

 
Top