वाशी (प्रतिनिधी)- दिनांक 1 ऑक्टोबर 2025 रोजी वंचित बहुजन आघाडी आणि सम्यक विद्यार्थी आंदोलन तर्फे शहरातील विविध प्रलंबित विकास कामांसाठी वाशी नगरपंचायतचे मुख्याधिकारी डी. जी. शिंदे यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनात शहरातील रस्ते, नाले, पाइपलाइन, सार्वजनिक सोयीसुविधा आदी महत्त्वाच्या 15 मागण्या मांडण्यात आल्या आहेत.
निवेदनात म्हटले आहे की, वार्ड क्र. 1 रस्ते व नाले दुरुस्ती, वार्ड क्र. 2 रस्त्यांची दुरुस्ती, वार्ड क्र. 3 रस्ते व नाल्यांचे काम, वार्ड क्र. 4 टेक्निकल शाळेजवळ रस्ता व पाइपलाइन, वार्ड क्र. 5 व्यायामशाळा, वाचनालय, सार्वजनिक नळ व बौद्ध विहारासाठी 1 कोटी रुपयांचा निधी याशिवाय इतर महत्त्वाच्या विकासकामांची मागणी करण्यात आली आहे. स्थानिक नागरिकांना योजनेच्या अभावामुळे मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत असून, आवश्यक निधी उपलब्ध असतानाही कामे रखडत असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. या सर्व विकासकामांना तात्काळ मान्यता द्यावी अन्यथा आंदोलनाचा मार्ग अवलंबावा लागेल, असा इशारा वंचित बहुजन आघाडी व सम्यक विद्यार्थी आंदोलनाने दिला आहे.
निवेदन स्विकारल्यानंतर मुख्याधिकारी शिंदे यांनी या बाबत तात्काळ उपाययोजना करण्यासाठी लेखी सूचना दिल्या. या निवेदनावर प्रदेश कार्यकारिणी सदस्य जयपाल सुकाळे, प्रशांत सुकाळे, अनिकेत बनसोडे, रोहन गायकवाड, सुमित गायकवाड, उत्कर्ष बनसोडे, शिद्धोधन सुकाळे, रुपेश सुकाळे, शैलेश गायकवाड आदींच्या सह्या आहेत.
