धाराशिव (प्रतिनिधी)- उबाठाच्या नेत्यांनी ऑगस्ट महिन्यात वसुलीसाठी दिलेल्या नोटीस दाखवत आज आंदोलनाची नौटंकी केली आहे हे दुर्दैवी आहे.

अतिवृष्टीमुळे बाधित शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी फडणवीस सरकारने बँकांना थेट आदेश देऊन कर्जवसुली थांबवली आहे. गेल्या आठवड्यात या विषयी आमदार राणाजगजितसिंह पाटील साहेब यांनी जिल्हाधिकारी यांना निर्देश दिले होते. त्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व बँकांची ऑनलाईन मिटिंग घेऊन स्पष्ट सूचना दिल्या की वसुली करायची नाही.

तरीदेखील जिल्ह्यातील शेतकरी संकटात असताना खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर आणि आमदार कैलास पाटील शेतकऱ्यांना मदत करण्याऐवजी ऑगस्ट महिन्यात आलेल्या नोटीस दाखवत संकटकाळात राजकारण करत आहेत.आमचा त्यांना सल्ला आहे तुम्ही 365 दिवस, 24 तास फक्त राजकारण करत असता; किमान आपत्तीच्या काळात तरी जनतेच्या मदतीसाठी काम करा. नौटंकी करत राजकारण करण्याऐवजी शेतकऱ्यांना मदत करा, त्यांच्या संकटात पाठीशी उभे राहण्यात तुमची शक्ती खर्च करा. खरी जनसेवा ही कृतीतून दिसते, नाट्यमय आंदोलनातून नव्हे.

 
Top