कळंब (प्रतिनिधी)- येथील कृषी उत्पन्न बाजार समिती,चे कार्यक्षेत्रात तसेच कळंब तालुक्यात यावर्षी पावसाने थैमान घालून अतिवृष्टी होवून अनेक वेळा तालुक्यात पूरग्रस्त परस्थितीि निर्माण होवून शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झालेले आहे. शेतातील उभी पिके पाण्याने खराब झाली आहेत. बाजार आवारात माल घेवून येणाऱ्या 80 ते 90 % लोकांचे सोयाबीन व इतर पिके नष्ट झाले आहेत. शेतकऱ्यांना कृषी उत्पन्न बाजार समतीि, यांचे कार्यालया मार्फत सभापती, उपसभापती व सर्व संचालक यांचे एक महन्यािचे मानधन व भत्ते तसेच सर्व कर्मचारी बांधव यांचे एक दविसाचे वेतन अशी एकूण 51 हजार 409 रूपये अतिवृष्टीमुळे शेतकरी बांधव यांचे झालेले नुकसानी करीता पुरग्रस्त शेतकरी बांधवांना मदत करून सदरील धनादेश सभापती, उपसभापती, सर्व संचालक मंडळाचे वतीने तहसलिदार यांना देण्यात आला. यावेळी बाजार समितीचे सभापती शिवाजी कापसे, उपसभापती श्रीधर भवर, संचालक बाळासाहेब पाटील, नाना कोल्हे, भारत सांगळे, पिंटू लंगडे, हरिचंद कुंभार, सचिव दत्तात्रय वाघ यांची उपस्थिती होती.