तुळजापूर (प्रतिनिधी)- श्रीतुळजाभवानी मातेच्या गुरुवार दि. 2 ऑक्टोबर रोजी उषःकाली होणाऱ्या सिमोल्लंघन सोहळ्यासाठी नगर येथुन पलंग पालखीचे तिर्थक्षेञ तुळजापूरात बुधवार दि.1 ऑक्टोबर रोजी नगरपरिषद वतीने पलंग पालखीचे पूजन मुख्याधिकारी अजिंक्य रणदिवे यांच्या हस्ते यांच्या हस्ते करण्यात येवुन पलंगपालखी मानक-यांचे स्वागत शहराच्या वतीने करण्यात आले.
नंतर ही पालखी विश्रांती स्थळी गेली. सांयकाळी ही पलंग पालखी रांगोळ्यांचा पायघड्यावरुन वाजतगाजत मंदीरात दाखल झाली. या पलंग पालखीचे दर्शन घेण्यासाठी शहरवासिय व भाविकांनी एकच गर्दी केली होती. या स्वागत वेळी स्वच्छता निरीक्षक दत्तात्रय साळुंखे, कार्यालयीन अधीक्षक चांगदेव ढोले, भांडारपाल बापूसाहेब रोचकरी, लेखापाल शरद पवार, तसेच सज्जन गायकवाड, मुज्जफर शेख, सुनील पवार, प्रमोद भोजने, जयजयराम माने, प्रशांत बुलबुले, राम मोगरकर, दत्ता चोपदार आदी मान्यवर उपस्थित होते.