भूम (प्रतिनिधी)- भूम येथील क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले सभागृहामध्ये दि. 13 ऑक्टोबर रोजी सोडण्यात आली. यावेळी उपभागीय अधिकारी रेवैयाह डोंगरे ,तहसीलदार जयवंत पाटील ,नायब तहसीलदार निवडणुक विभाग मनोरमा गाडे, नायब तहसीलदार प्रवीण जाधव, अभिजीत खराटे,सागर बागडे, उपस्थित होते.
भूम तालुक्यामध्ये एकूण दहा गणाची सोडत येथील गुरुदेव दत्त हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी चिठी काढून करण्यात आली . यामध्ये पखरुड सर्वसाधारण महिला, ईट सर्वसाधारण , सुकटा नागरिकांचा मागास प्रवर्ग,आरसोली सर्वसाधारण,पाथरूड सर्वसाधारण, आंबी नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, वालवड सर्वसाधारण महिला,चिंचोली अनुसूचित जाती महिला, आष्टा सर्वसाधारण महिला,माणकेश्वर सर्वसाधारण याप्रमाणे पंचायत समिती गणाची सोडत काढण्यात आली.यावेळी युवराज तांबे,भगवान बांग,दीपक मुळे, अतुल शेळके, खंडू गोयकर,बालाजी कुटे ,वसंत यादव यांच्यासह तालुक्यातील नेते उपस्थित होते.