कळंब (प्रतिनीधी)- नीट पीजी, एआयएपीजीईटी, युजी, अशा वैद्यकीय शिक्षण पुर्व पात्रता परीक्षेत गुणवत्ता धारण केलेल्या उमेदवारांना त्यांच्या गुणवत्तेनुसार शासकिय, निमशासकीय,खाजगी अशा वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयात महाराष्ट्र सिईटी सेल मार्फत निवडी करण्यात येत आहेत.
30 जुलै रोजी एआयएपीजीईटी-2025 या देशपातळीवर घेण्यात आलेल्या परीक्षेत येथील डॉ.शिवाई संतोष भांडे यांनी बाजी मारत देशात 211 वा क्रमांक, राज्यात 54 वा तर एनटी(ब) प्रवर्गातून महाराष्ट्रात 1 पहीली येण्याचा मान पटकावत धाराशिवच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला होता. आज त्याच गुणवत्तेने त्यांनी मुंबई येथील नामांकित पोद्दार शासकिय आयुर्वेद वैद्यकीय महाविद्यालय तथा रूग्णालय येथे त्यांना एम एस (सर्जरी) या पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमास प्रवेश मिळाला आहे.यावर्षी अशी निवड झालेल्या धाराशिव जिल्ह्यातील त्या एकमेव डॉक्टर आहेत.कोणतीही उच्चशिक्षणाची पार्श्वभूमी नसताना अश्याप्रकारे सातत्याने यशस्वी झालेल्या डॉ.शिवाई भांडे यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.