उमरगा (प्रतिनिधी)- त्रिरत्न बौद्ध महासंघाच्या वतीने ऐन दिवाळीच्या सुट्टीत रविवार पासून( दि.19 ते दि.23) च्या दरम्यान शहरातील बहुजन हिताय विद्यार्थी वसतिगृहात पाच दिवशीय निवासी धम्मशिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.शिबिराचे नेतृत्व पुणे येथील धम्मचारी अनोमकीर्ती करणार असून समर्पित धम्मजीवन या विषयावर हे शिबीर होत असून समर्पित धम्मजीवन जगण्याचा अनुभव घ्यावा असे आवाहन धाराशीवच्या त्रिरत्न बुद्धिस्ट सेंटरचें चेअरमन धम्मचारी रत्नपालित यांनी केले आहे.

पाच दिवस चालणाऱ्या निवासी धम्मशिबिरात ध्यान,पूजा,संपर्क घेण्यात येणार असून संध्याकाळी वेगवेगळ्या विषयांवर धम्म प्रवचने होणार आहेत.शिबीरात धम्मचारी प्रज्ञाजित, धम्मचारी कल्याणदस्सी,धम्मचारी रत्नपालित,धम्मचारी ज्ञानपालित, धम्मचारी धम्मभूषण,धम्मचारी संमतबंधू, धम्मचारी जिनोदय,धम्मचारी जिंनघोष,धम्मचारी विबोध आदी उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. शिबीरात महिला पुरुषांची राहण्याची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली असून पाच दिवस एकत्र राहून धम्मजीवन अनुभवण्याचा सराव करता येणार आहे नागरिकांनी मोठया संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन संयोजक समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

 
Top