धाराशिव (प्रतिनिधी)- भाई उद्धवराव पाटील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी सहकारी पतसंस्था म. धाराशिवच्या वतीने राज्यातील पूरग्रस्तांसाठी 2.51 लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला. संस्थेचे अध्यक्ष विशाल घोगरे, सचिव अमरसिंह देशमुख व संतोष मोरे यांनी मुख्यमंत्री सहायता निधी कक्षास जिल्हाधिकारी कीर्तीकुमार पुजार यांच्याकडे दिनांक २९ सप्टेंबर २०२५ रोजी सुपूर्द करण्यात आला.
भाई उद्धवराव पाटील शिक्षक पतसंस्थेने यापूर्वी शासकीय जिल्हा रुग्णालय धाराशिव यांच्यासाठी कोरोना काळात दोन लाख रुपयांची वैद्यकीय उपकरणे खरेदी केली होती व मुख्यमंत्री सहाय्यता कक्षास पन्नास हजार रुपयांचा धनादेश देण्यात आला होता. धाराशिव जिल्ह्यात दुष्काळ दरम्यान पिण्याच्या पाण्याच्या टाक्या वाटप,पाणी आडवा पाणी जिरवा योजनेस आर्थिक सहाय्य करण्यात आले होते. आत्महत्याग्रस्त विधवा पत्नीसही रोख स्वरूपात मदत करण्यात आली होती.
संस्थेस यापूर्वी महाराष्ट्र शासनाचा २०१४ मध्ये सहकार निष्ठ तर २०१६ मध्ये सहकार भूषण हे दोन पुरस्कार मिळाले होते. संस्थेचे अध्यक्ष विशाल घोगरे,उपाध्यक्ष शशिकांत पडवळ,सचिव अमरसिंह देशमुख, संचालक बालाजी तांबे, विजयकुमार कुलकर्णी, रवींद्र शिंदे, विलास खरात, अमोल सरवळे, उत्तरेश्वर चव्हाण, बाळासाहेब नरवडे,ललिता लोमटे, सिंधू कांबळे, कर्मचारी करण पेठे, सभासद व हितचिंतकाचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.