तेर (प्रतिनिधी)- धाराशिव जिल्ह्यातील विविध गावांमध्ये अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची राष्ट्रवादी युवती काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार राष्ट्रीय युवती अध्यक्षा सक्षणा सलगर यांनी पहाणी करून नागरिकांची मते जाणून घेतली. परंडा तालुक्यातील नालगाव, वडनेर, देवगाव या गावात सक्षणा सलगर यांनी भेट देऊन अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीच्या परस्थितीची माहिती जाणून घेतली.