वाशी (प्रतिनिधी)- तालुक्यातील पारगाव येथील प्रवीण अच्युतराव डोके यांनी मोठे यश संपादन केले आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामार्फत दिनांक 15 जून 2025 रोजी आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय पात्रता परीक्षामध्ये त्यांनी हिंदी विषयात उत्तीर्ण होत आपल्या गुणवत्तेची छाप पाडली आहे.

या परीक्षेचा निकाल दिनांक 30 ऑगस्ट रोजी जाहीर झाला असून त्यात प्रवीण डोके यांनी उत्तम यश मिळवत स्वतःचे, कुटुंबाचे तसेच पारगाव गावाचे नाव उज्ज्वल केले आहे. सहाय्यक प्राध्यापक म्हणून पात्रता सिद्ध करणाऱ्या या यशामुळे शैक्षणिक क्षेत्रात त्यांच्यासमोर नवे मार्ग खुले झाले आहेत. त्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल शिक्षक, विद्यार्थी, मित्रपरिवार तसेच विविध सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातून त्यांचे हार्दिक अभिनंदन केले जात आहे.

 
Top