धाराशिव (प्रतिनिधी)- सलग अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात शेतकऱ्यांचे पिक आणि जमीन मोठ्या प्रमाणात नष्ट झाली आहे. या पार्श्वभूमीवर धाराशिव जिल्हा शेतकरी बचाव अराजकीय कृती समितीने मुख्यमंत्री आणि जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन सादर केले आहे.

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, धाराशिवमधील देवस्थान जमिनीवरील वहिवाटदार शेतकऱ्यांचे सोयाबीन, मुग, उडीद, तूर, मका यासारखी खरीप पिके पाण्याखाली आले असून प्रचंड नुकसान झाले आहे. अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी वाहून गेल्या असून, त्यांनी मेहनत आणि खर्च करून शेती केली. तरी त्यांना पिकविमा किंवा शासकीय अनुदान मिळत नाही. जरी ही शेतकऱ्यांची जमिन मालकीची नसली, तरी त्यांनी मेहनत करून सरकारसाठी शेतसारा भरणा केलेला आहे. त्यामुळे अन्य शेतकऱ्यांसारखी नुकसान भरपाई त्यांनाही मिळावी, अशी समितीची मागणी आहे.

या निवेदनावर संस्थापक अध्यक्ष धनंजय शिंगाडे ,भुजंग उर्फ प्रमोद सुर्यवंशी, शंकर बप्पा सुर्यवंशी, बलराज रणदिवे, अनिरुध्द कावळे, वासुदेव सुर्यवंशी,रणजित गरड, प्रविण सुर्यवंशी, श्रीराम सूर्यवंशी, ओम सूर्यवंशी, विक्रम सूर्यवंशी, विनोद कदम, सुनील सूर्यवंशी, संदीप सूर्यवंशी, राकेश सूर्यवंशी, अभिजीत सूर्यवंशी, भुजंग नायकल, सुधीर सूर्यवंशी, कुलदीप सूर्यवंशी, अभिजीत सूर्यवंशी, मुंडे यांच्यासह आदि शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.


 
Top