धाराशिव (प्रतिनिधी)- जिल्ह्यातील सलग अतिवृष्टीमुळे घरं, शेती तसेच विद्यार्थ्यांचे शिक्षण गंभीर संकटात आले आहे. या पार्श्वभूमीवर प्रदेशाध्यक्ष सुनिल गव्हाणे यांचे मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस पार्टी धाराशिव जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर शिवाजीराव निंबाळकर यांनी दि. 29 सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन सादर केले.

निवेदनात मागणी केली आहे की, अतिवृष्टीग्रस्त विद्यार्थ्यांचे विद्यापीठांतर्गत पुढील वर्षापर्यंतचे सर्व परीक्षा शुल्क, शैक्षणिक शुल्क आणि वसतिगृह शुल्क माफ करावे. तसेच चार महिन्यांकरिता भोजन भत्ता द्यावा, अर्जांच्या अंतिम तारखांमध्ये वाढ करावी आणि पाण्यामुळे शैक्षणिक साहित्य गमावलेल्या विद्यार्थ्यांना नवीन साहित्य पुरवावे. अशा मागण्या दिलेल्या निवेदनातून करण्यात आलेल्या आहेत.

 
Top