धाराशिव (प्रतिनिधी)- परंडा तालुक्यातील मौजे हिंगणगाव (खुर्द) येथील विलास अंबादास गायकवाड (वय 50) हे दि.21 सप्टेंबर रोजी नळी नदीच्या पुराच्या पाण्यात वाहून गेले होते.त्यांचा मृतदेह 25 सप्टेंबर रोजी सापडला. पोलिसांनी पंचनामा करून अंत्यविधी करण्यात आला.
या घटनेनंतर जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांनी 27 सप्टेंबर रोजी मयताच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांना धीर दिला.तसेच तहसीलदार आणि तालुका कृषी अधिकाऱ्यांना तात्काळ मदतकार्य करण्याचे निर्देश दिले.तसेच यावेळी जिल्हाधिकारी पुजार यांनी परंडा तालुक्यातील नुकसानग्रस्त गावांची पाहणी केली व ग्रामस्थांशी संवाद साधला.