धाराशिव (प्रतिनिधी)- राज्य शासनाने सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धा 2025 चे निकाल जाहीर केले असून, धाराशिव जिल्ह्यातील तीन गणेश मंडळांनी यंदा आपली छाप पाडली आहे.
जिल्हास्तरावर श्रीकृष्ण गणेश मंडळ, गवळीवाडा,धाराशिव यांना प्रथम क्रमांक, समर्थ गणेश तरुण मंडळ, परंडा यांना द्वितीय क्रमांक तर तुळजाई सांस्कृतिक व क्रीडा मंडळ, तुळजापूर यांना तृतीय क्रमांकाचा मान मिळाला आहे. या मंडळांना अनुक्रमे 50,000, 40,000 व 30,000 हजार इतकी पारितोषिके तसेच प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे.पारितोषिक वितरण समारंभ राज्यस्तरीय विजेत्यांसाठी मुंबईत, तर जिल्हास्तरीय विजेत्यांसाठी संबंधित जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडणार आहे.