धाराशिव (प्रतिनिधी)- मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील चांदणी व खासापूर धरणातील पाण्याची पातळी वाढल्याने पाण्याच्या विसर्गात वाढ करण्यात आली आहे. दरम्यान लोहारा तालुक्यातील नागूर येथील बालाजी त्र्यंबक मोरे हा व्यक्ती निम्न तेरणा प्रकल्पात वाहून गेला होता. त्याचे शव आज सापडले आहे. दरम्यान जिल्ह्यातील अनेक गावात पुर परस्थितीमुळे जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. 

चांदणी धरण  धरणावरील एकूण 28 स्वयंचलित गेटपैकी सध्या 22 गेट सुरू आहेत.आज दुपारी 3.00 वाजता नदीपात्रात 18 हजार 528 क्युसेकने विसर्ग सुरू आहे.धरणात पाण्याची आवक सुरू असल्याने पुढील काळात अजून गेट उघडण्याची तसेच विसर्गात वाढ/कमी होण्याची शक्यता आहे. खासापूर धरण  धरणाच्या सांडव्यावरून सध्या 17 हजार 189 क्युसेकने विसर्ग नदीपात्रात सुरू आहे.धरणात पाण्याचा ओघ कायम असल्याने सांडव्यावरील विसर्गातही बदल होऊ शकतो. प्रशासनाने चांदणी व उल्फा नदीच्या दोन्ही तीरावरील शेतकरी व नागरिकांनी सावधानता बाळगावी, असा इशारा दिला आहे.


 
Top