धाराशिव (प्रतिनिधी)- राज्यातील 10 वर्षे सेवा पूर्ण झालेल्या एनएचएम कर्मचाऱ्यांना शासनसेवेत सामावून घेण्यासाठी दि. 14 मार्च 2024 रोजी शासन निर्णय काढून दीड वर्ष लोटली. तरी अद्याप कोणतीच कार्यवाही झाली नाही. त्या विरोधात दि. 19 ऑगस्टपासून जिल्ह्यातील कंत्राटी आरोग्य कर्मचारी संघटनेचे कामबंद आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाबाबत संबंधित मंत्र्यासोबत मंगळवार दि. 9 सप्टेंबर रोजी सायंकाळी बैठक होत आहे. 

आंदोलनाचा 22 वा दिवस उजाडला तरी अद्याप शासनाकडून कुठलाच तोडगा न निघाल्याने कर्मचारी संतप्त आहेत. तरीही शासनाने कार्यवाही न केल्याने दि. 1 ऑगस्टपासून कंत्राटी कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू केले आहे. मात्र 20 दिवसानंतर शासनाने आंदोलनाची दखल घेतलेली नाही. आंदोलनात राज्य समन्वयक जीवन कुलकर्णी, कार्याध्यक्ष शरद हिंगमिरे, जिल्हाध्यक्ष किरण बारकुल, डॉ. विलास तोडकर, सतीश गिरी, किरण तानवडे आदींनी सांगितले. 


मुंबईत बैठक चालू

एनएचएम कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाबाबत मुंबईत मंगळवार दि. 9 सप्टेंबर रोजी बैठक असून, या बैठकीत मार्ग निघून आंदोलन समाप्त होईल अशी अपेक्षा आहे. संबंधित मंत्री महोदय या आंदोलनाच्याबाबत बैठक घेणार आहेत. 

राज्य समन्वयक जीवन कुलकर्णी


 
Top