धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव,लातूर, बीड, सोलापूर,अहिल्यानगर व कर्नाटक राज्यातील बिदर जिल्ह्यात कार्यक्षेत्र असलेली मराठवाड्यातील अग्रणी सहकारी बँक म्हणून जनता सहकारी बँक लि. धाराशिव बँकेचा श्री संत ज्ञानेश्वर मंदिर सभागृह धाराशिव येथे कर्मचारी गुणगौरव सोहळा व मोबाईल बँकिंग अँपचा शुभारंभ सोहळा बँकेचे अध्यक्ष वसंतराव नागदे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.
या कार्यक्रमास मोटिव्हेशनल स्पीकर जयेश मार्तंडराव देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ संजय घोडके उपस्थित होते. कार्यक्रमाची प्रस्तावना व कार्यक्रमाचे प्रमुख त्यांचा परिचय बँकेचे डॉ. संजय घोडके यांनी करून दिला. बँकेने अद्यावत तंत्रज्ञानाचा अवलंब करून बँकेचे मोबाईल बँकिंग ॲपचा शुभारंभ करण्यात आला. जेणेकरून बँकेच्या ग्राहक, सभासद, खातेदार यांना आरटीजीएस, एन इ एफ टी यासारख्या विविध सेवा ॲपच्या माध्यमातून उपलब्ध होणार आहेत. ग्राहकांच्या सोयीसाठी बँक नेहमीच अद्यावत तंत्रज्ञानाला प्राधान्य देते हे मोबाईल ॲप हे त्याच दिशेने एक पुढचे पाऊल आहे. तसेच बँक लवकर व इंटरनेट बँकिंग सेवा कार्यान्वित करणार आहे असे संचालक आशिष मोदानी यांनी सांगितले. त्यानंतर बँकेच्या सेवेतून सेवानिवृत्त झालेल्या 42 माजी कर्मचाऱ्यांना सेवापारितोषक संचालक मंडळाच्या हस्ते देण्यात आले तसेच त्यांना बँकेच्या वतीने बॅग स्मृतीचिन्ह भेट देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.
त्यानंतर साल सण 2024-2025 या आर्थिक वर्षातील केलेल्या कामकाजाचा गुणगौरव बँकेच्या विविध शाखेतील अधिकारी कर्मचारी सेवक व पिग्मी एजंट यांचा बॅग स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी उपाध्यक्ष वैजनाथ शिंदे, ज्येष्ठ संचालक विश्वास शिंदे, तानाजी चव्हाण,सुभाष धनुरे, आशिष मोदानी, प्रदीप जाधव पाटील,नंदकुमार नागदे,हरी सूर्यवंशी, डॉ जयसिंग देशमुख, बँकेतील सर्व कर्मचारी व पिग्मी एजंट उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ संजय घोडके यांनी सर्वांच्या आभार मानले व कार्यक्रम संपला असे जाहीर केले.