धाराशिव (प्रतिनिधी) - शहरासाठी विस्तारित पाणी पुरवठा योजना करणे आवश्यक आहे. कारण उजनी वरून पाणी उपसा करणे हे खर्चिक असल्यामुळे शासनाने अमृत 2.0 या योजनेस मान्यता दिली आहे. त्यासाठी तेरणा धरणावरून पाईपलाईन टाकण्याचे काम सुरू आहे. ते काम व्यवस्थित होत आहे किंवा नाही ? याची प्रत्यक्ष खातरजमा करण्यासाठी नगर परिषदेच्या मुख्याधिकारी नीता अंधारे यांनी दि.11 सप्टेंबर रोजी प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी जाऊन पाहणी केली.

धाराशिव शहरात आवश्यक असलेले पाणी उजनी धरणातून आवश्यक त्या प्रमाणात येत नाही. तसेच वेगवेगळ्या तांत्रिक कारणामुळे देखील पाणी उपसा बंद राहिल्याने शहरवासियांना पाणी टंचाईचा नाहकपणे सामना करावा लागतो. त्यामुळे राज्य शासनाने अटल अमृत 2.0 या योजनेस मान्यता दिली आहे. त्यासाठी 230 कोटी रुपयांचा निधी देखील मंजूर केलेला आहे. या योजने अंतर्गत धाराशिव तालुक्यातील तेर येथील तेरणा धरण ते धाराशिव शहरातील पाण्याच्या पद्धती पाईपलाईन टाकून ते पाणी आणण्यात येणार आहे. त्या पाईप लाईनचे काम सुरू करण्यात आले आहे. मात्र, नगर परिषदेचा मागील कारभार पाहता कोणत्याही वनवा व त्रुटी राहू नयेत यासाठी ते काम व्यवस्थित रित्या होत आहे किंवा नाही याची खातरजमा करावी यासाठी खास स्वतः नगर परिषदेच्या मुख्याधिकारी नीता अंधारे यांनी प्रत्यक्ष कामाच्या स्थळी जाऊन पाहणी करीत संबंधितास आवश्यक त्या सूचना दिल्या. यावेळी त्यांच्या समवेत बांधकाम अभियंता प्रदीप स्वामी पाणी पुरवठा अभियंता संग्राम भापकर, यांच्यासह मानवसेवा कन्सल्टंट ठेकेदार प्रतिनिधी कंपनीचे प्रतिनिधी संजय मोरे आदी उपस्थित होते.

 
Top