धाराशिव (प्रतिनिधी)- आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचे डी. फार्मसी इन्स्टिटयुट, उंबरे कोठा, धाराशिवच्या वतीने आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ धाराशिवचा वर्धापन दिन आणि गुरुवर्य के. टी. पाटील सर यांच्या 96 व्या जयंतीनिमित्त भव्य व्हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन दिनांक 8 व 9 सप्टेंबर 2025 रोजी करण्यात आले आहे. या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सुधीर पाटील तसेच मुख्य प्रशासकीय अधिकारी आदित्य पाटील आणि कॉलेजचे प्राचार्य डॉ. गोरख देशमाने यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी डॉ. अमोल जोशी प्राचार्य, के.टी. फार्मसी कॉलेज, चतुर्वेदी प्राचार्य फाईंग किड्स इंटरनॅशनल स्कुल धाराशिव, डॉ. पसारे प्राचार्य आभियांत्रिकी महाविद्यालय आणि विविध कॉलेजच्या शिक्षक व कर्मचाऱ्यांच्या उपस्थिती होती. कार्यक्रमाची सुरुवात गुरुवर्य श्री के.टी. पाटील यांच्या प्रतिमेच्या पुजनाने करण्यात आली. यावेळी सुधिर पाटील यांचा सत्कार डॉ. गोरख देशमाने प्राचार्य यांनी केला. तरी आदित्य पाटील यांचा सत्कार श्रीकांत देशमुख यांनी केला. कार्यक्रमाचे निवेदन रविंद्र जाधव यांनी केले. या स्पर्धेत 18 संघानी भाग घेतला आहे. स्पर्धेचे आयोजन करण्यात श्रीकांत देशमुख, किरण अडचित्रे, सत्यजित शिंदे व कॉलेजचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.