मुरुम (प्रतिनिधी)- नगर शिक्षण विकास मंडळ संचलित श्री माधवराव पाटील महाविद्यालयाच्या सांस्कृतिक सभागृहात शिक्षण महर्षी माधवराव (काका) पाटील यांच्या नावाने राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन वादविवाद स्पर्धेचे पारितोषिक वितरण शुक्रवारी (ता. 19) रोजी करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. अशोक सपाटे होते. याप्रसंगी संस्थेचे संचालक प्रा. डॉ. सतिश शेळके, उपप्राचार्य डॉ. चंद्रकांत बिराजदार, फार्मसी कॉलेजचे प्राचार्य डॉ. सादक वली, परीक्षक डॉ. संजय बिराजदार, डॉ. विवेकानंद वावळे, डॉ. किरण राजपूत, प्रा. अशोक बावगे आदींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी पुणे येथील सावित्रीबाई फुले विद्यापीठातील तेजस पाटील व वरूण घरटे (प्रथम) रोख 11001 रुपये, वारजे माळवाडी, पुणे येथील कला, वाणिज्य महाविद्यालयातील नितीन गागरे व रोहन कवडे (द्वितीय) रोख 7001 रुपये, निलंगा येथील महाराष्ट्र महाविद्यालयातील कु. गीता वाडकर व कौशल्या बेलकुंदे (तृतीय) रोख 5001 रुपये, मुरुमच्या श्री माधवराव पाटील महाविद्यालयातील हिराबाई सोलापूरे (उत्तेजनार्थ) रोख 2001 रुपये, उमरगा येथील श्रमजीवी अध्यापक महाविद्यालयातील नौशिन सास्तुरे (उत्तेजनार्थ) रोख 2001 रुपये, सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देवून आदींचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी डॉ. संजय बिराजदार यांनी मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, आजचा काळ हा स्पर्धात्मक आहे. प्रत्येक क्षेत्रात यश संपादन करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. तंत्रज्ञानाच्या युगात तुमच्यासमोर असलेल्या संधी अमर्याद आहेत, पण त्या प्राप्त करण्यासाठी कष्ट, शिस्त आणि प्रामाणिक प्रयत्न हे तुमच्या हातात आहे. तुमचं ध्येय ठरवा, त्याच्यासाठी झटत राहा. यशाचा मार्ग कधीच सोपा नसतो, पण मेहनतीच्या जोरावर यश निश्चित मिळवता येते. अध्यक्षीय समारोप डॉ. अशोक सपाटे यांनी केला. याप्रसंगी स्पर्धेत सहभागी झालेल्या कु. गीता वाडकर, मनिषा जांगीड, नितीन गागरे, डॉ. सुदर्शन पिडगे आदींनी मनोगत व्यक्त केले. प्रा. गोपाळ कुलकर्णी, प्रा. डॉ. महेश मोटे, डॉ. सुधीर पंचगल्ले, डॉ. रमेश आडे, डॉ. मुकुंद धुळेकर, डॉ. राजेंद्र गणपूरे, डॉ. प्रकाश कुलकर्णी, डॉ. सुजित मटकरी, डॉ. अविनाश मुळे, डॉ. विनायक रासुरे, डॉ. रवींद्र आळंगे, डॉ. रवींद्र गायकवाड, प्रा. अजिंक्य राठोड, राजू ढगे, एम. सी. पाटील, प्रभाकर महिंद्रकर, लालअहमद जेवळे आदींनी पुढाकार घेतला. सूत्रसंचालन प्रा. डॉ. सुभाष हुलपल्ले तर आभार प्रा. डॉ. नागोराव बोईनवाड यांनी मानले. यावेळी विविध महाविद्यालयाचे स्पर्धक, विविध शाखेतील विद्यार्थी-विद्यार्थिनी बहुसंख्येने उपस्थित होत्या.