मुरूम (प्रतिनिधी)- उमरगा तालुक्यात व मुरुम परिसरात सण 2025 मध्ये सर्वत्र अतिवृष्टी जन्य पाऊस झाला आहे त्यामुळे शेतकरी आसमानी संकटात अडकले आहेत, काही ठिकाणी ढगफुटी झाली आहे,तालुक्यातील असंख्य शेतकऱ्याचे खरीप पिके पाण्यात आहेत, काही ठिकाणी पंचनामा करणेही शक्य नाही त्यामुळे उमरगा तालुक्यातील सर्व महसूल मंडळाचा अतिवृष्टी मध्ये समावेस करावा ही विनंती, त्याचबरोबर सण 2024 खरीप हंगामातील सोयाबीन अतिवृष्टी अनुदानातून मुरूम मंडळाला वगळण्यात आले आहे त्यामुळे शेतकऱ्यांना अनुदाना पासून मुकावे लागले, तांत्रिक अडचणीचा बोजवरा शेतकऱ्यांवर ढकलून त्यांच्यावर अन्याय करू नका, मुरूम महसूल मंडळाचा सण 2024 खरीप पिकांचा अतिवृष्टी मध्ये समावेश करून शेतकऱ्यांना अनुदान देऊन न्याय द्यावा अन्यथा बसव प्रतिष्ठानच्या माध्यमातून आंदोलन छेडण्यात येईल त्यास शासन जबाबदार राहील असा इशाराही देण्यात आला आहे. वरील विषयावर गांभीर्याने दखल घेऊन योग्य ती कारवाई करून तालुक्यातील शेतकऱ्यांना न्याय द्याल ही अपेक्षा..मुरूम महसूल मंडळाला वारंवार जाणूनबुजून वगळ्यात येते याकडे लक्ष द्याल ही अपेक्षा असे निवेदनात म्हंटले आहे.
उमरगा तालुका अतिवृष्टी जाहीर करण्याची मागणी ईमेल द्वारे केली असून मुरूम महसूल मंडळाला जाणूनबुजून वारंवार वगळन्यात येते याकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे, तांत्रिक अडचणी मुळे मुरूम महसूल मंडळातील शेतकऱ्यांना 2024 खरीप अनुदान मिळाला नाही तेही मंजूर करण्याची मागणी केली आहे,शेतकरी आसमानी संकटात हवालदिल झाला आहे, त्यामुळे पंचनामे नको सरसकट उमरगा तालुक्यातील सर्व महसूल मंडळात अतिवृष्टी जाहीर करावे.
डॉ. रामलिंग पुराणे
समाजसेवक तथा अध्यक्ष बसव प्रतिष्ठान
मुरूम महसूल मंडळाला जाणूनबुजून वारंवार अतिवृष्टी मधून वगळण्यात येते, मुरूम महसूल मंडळाकडे प्रशासनाचा दुर्लक्ष होत आहे...
निर्मलकुमार लिमये, शेतकरी, मुरूम