भूम (प्रतिनिधी)- आदिवासी पारधी समाजाचे आधार कार्ड , जात प्रमाणपत्र, मतदान ओळख पत्रा सारखे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. हि कागदपत्र उपलब्ध करून देण्यासाठी ठिकठिकाणी वेळोवेळी कॅम्प घेण्याचा प्रयत्न करू असे आश्वासन नायब तहसिलदार प्रविण जाधव यांनी दिले.
रविवार दि. 31 ऑगस्ट 2025 रोजी भूम तहसिल कार्यालय सभागृह येथे भटके विमुक्त दिन साजरा केला. यावेळी नायब तहसिलदार प्रविण जाधव, भटके विमुक्त परिषदचे जिल्हाध्यक्ष बयास काळे, पत्रकार शंकर खामकर, हभप अरुण काळे महाराज, दिनेश काळेसह भूम, वाशी, परंडा तालुक्यातील आदिवाशी पारधी समाज महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी भटके विमुक्त परिषदचे जिल्हाध्यक्ष बयास काळे, हभप अरुण काळेसह अनेकांनी बहुतांश पारधी समाज कुटुंबाला स्वतःचे हक्काचे घर नाही, जागा नाही, जिथे पिढ्यान पिढ्या राहतात ती जागा देखील नावे करून दिली जात नाही. आधार कार्ड नाही, मतदान कार्ड नाही, रेशन कार्ड नाही, घरकुलाचा लाभ दिला जात नाही. या समाजाला स्मशान भूमी देखील नाही. अनेक प्रश्नाला सामोरे जावे लागत आहे. या समाजाच्या प्रश्नाकडे प्रशासनाची उदासीनता दिसून येत आहे. यामुळे यापुढील काळात प्रशासनाने सहकार्याची भूमिका द्यावी. अन्यथा आदिवासी पारधी समाज बांधवाला देखील इतर समाजाप्रमाणे एक पारधी लाख पारधी हे संघटनात्मक चळवळीचे हत्यार उपसावे लागेल असाही इशारा दिला. कार्यक्रमाच सुत्रसंचलन एकनाथ काळे यांनी केले. तर आभार सुधिर काळे यांनी मानले.