धाराशिव (प्रतिनिधी)- आज दि.26/09/2025 रोजी सकल धनगर समाजाच्या वतीने जालना येथे चालू असलेल्या संघर्ष योद्धा दिपक भाऊ बोऱ्हाडे यांच्या आमरण उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी  तसेच त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देण्यासाठी शेकडो धनगर समाजाच्या कार्यकर्त्यांनी एक दिवसीय धरणे आंदोलन जिल्हाधिकारी कार्यालय धाराशिव यांच्यासमोर केले. तसेच सकल मराठा समाजाच्या वतीने  उपोषण करते दीपक भाऊ बोऱ्हाडे यांच्या उपोषणाला जाहीर पाठिंबा देण्यात आला. जिल्हा विधीज्ञ मंडळ धाराशिव यांच्या वतीने  सकल धनगर समाज आंदोलनाला जाहीर पाठिंबा देण्यात आला. आंदोलनाची दखल घेऊन नायब तहसीलदार खोत  यांनी आंदोलन स्थळी येऊन निवेदन स्वीकारले व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांच्याकडे आम्ही आपल्या मागण्या पाठवून सकारात्मक चर्चा घडवू असे आश्वासन दिले. यावेळी धाराशिव जिल्ह्यातील सकल धनगर समाज खूप मोठ्या संख्येने उपस्थित होता.


 
Top