तेर (प्रतिनिधी)- ज्ञानात भर पडावी म्हणून धाराशिव तालुक्यातील तेर येथील जिल्हा परिषद कन्या प्रशालेत पाढे पाठांतर अभिनव उपक्रम चार वर्षांपासून सहशिक्षक सुशिलकुमार क्षिरसागर राबवित आहेत.

धाराशिव तालुक्यातील तेर येथील जिल्हा परिषद कन्या प्रशालेत विद्यार्थीनी यांना अभ्यासाची गोडी लागावी.अंकगणिताची ओळख व्हावी म्हणून पाढे पाठांतर उपक्रम सहशिक्षक सुशिलकुमार क्षिरसागर राबवितात. हा उपक्रम 4थी च्या विद्यार्थीनीसाठी राबविण्यात येत आहे.चार वर्षांपासून पाढे पाठांतर करणे (किमान30पर्यंत कमाल विद्यार्थी कुवतीनुसार) उपक्रम राबविण्यात येत आहे.विजेत्यां विद्यार्थीनींना बक्षीस म्हणून विद्यार्थीनी मागेल तेवढे शैक्षणिक साहित्य वर्गशिक्षक सुशिलकुमार क्षिरसागर बक्षीस म्हणून देतात.या उपक्रमाचा मुख्य हेतु हा आहे की,विद्यार्थीनीना गणितातील गुणाकार क्रिया सोप्या पद्धतीने करता याव्यात.गणित विषयाची आवड निर्माण व्हावी हा आहे अशी माहिती हा उपक्रम राबविणारे सहशिक्षक सुशिलकुमार क्षिरसागर यांनी सांगितले.

 
Top