धाराशिव (प्रतिनिधी) स्वातंत्र्य सेनानी विश्वनाथ आबा कोळगे सोसायटी रुईभर संस्थेच्या वतीने मराठवाडा मुक्ती संग्राम दिन व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त रुईभर ता.धाराशिव येथील जयप्रकाश माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात मराठवाडा मुक्तिसंग्रामामध्ये धाराशिव जिल्ह्याचे योगदान या विषयावर सोमवारी दि 15 सप्टेबर रोजी खुल्या वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे या स्पर्धेत प्रथम बक्षीस 1501/- द्वितीय बक्षीस 1001/- तृतीय बक्षीस 701/- तर चतुर्थ बक्षीस 501/- अशी बक्षिसे देण्यात येणार आहेत सदरील स्पर्धेचा वेळ पाच मिनिटांचा असेल तरी इच्छुक स्पर्धकांनी सोमवार दि 15 सप्टेंबर रोजी सकाळी 9.30 वाजता उपस्थित राहावे. स्पर्धेसाठी नाव नोंदणी तेजसिंह कोळगे. मो. क्रंमाक 9405360078, 9356742090 यांच्याशी संपर्क करावा व स्पर्धकांनी जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे. असे आवाहन स्वातंत्र्य सेनानी विश्वनाथ आबा कोळगे सोसायटीच्या वतीने करण्यात आले आहे.