उमरगा (प्रतिनिधी)-  उमरगा-लोहारा तालुक्यात सतत झालेल्या अवकाळी पावसामुळे खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. हातचे पीक फसल्याने शेतकरी गंभीर आर्थिक संकटात सापडला आहे.

या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात शासनाने सहानुभूतीपूर्वक विचार करून तालुक्यात सरसकट ओला दुष्काळ जाहीर करावा, बाधित शेतकऱ्यांना प्रति एकरी 50 हजार रुपये आर्थिक मदत द्यावी, तसेच आगामी रब्बी हंगामासाठी मोफत बियाणे आणि खत उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी करण्यात आली.

पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी शासनाला इशारा देत सांगितले की, शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान लक्षात घेऊन तातडीने मदतीचा निर्णय घेतला नाही, तर शिवसेना शैलीत तीव्र आंदोलन छेडले जाईल. यावेळी उपस्थितीत जिल्हा प्रमुख शेतकरी सेना विजयकुमार नागणे, तालुका अध्यक्ष शेतकरी सेना विजयकुमार तळभोगे, रझाक आत्तार, सुधाकर पाटील, रणधीर पवार, डी. के. माने, राजेंद्र समाने, अप्पाराव गायकवाड, मारुती थोरे,धीरज बेलंबकर संतोष कलशेट्टी, संतोष जाधव, पवन त्रिमुखे, दत्त पांडुरंग शिंदे, आदिनाथ काळे, विजय गायकवाड, अभिषेक स्वामी, शिवकांत पतगे, आकाश गायकवाड, सगर उमशेट्टी, सदाशिव पाटील, , तानाजी जाधव, जयराम चव्हाण, बिराजदार श्रीकर, रवी बडोरे, मल्लिकार्जुन बिराजदार, रमेश पवार, शैलेश नागणे, आकाश शर्मा, शहाजी गायकवाड, पंडित माशाळे, विशाल गायकवाड, अण्णाराव माने, शिवाजी गायकवाड, सिद्धराम हत्तरगे, निकेश मारेकर, विलास माने, प्रकाश बेळंबे, सदाशिव भातागळीकर, शंभूलिंग स्वामी, हरी मदने आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 
Top