उमरगा(प्रतिनिधी)- महसुल सेवक (कोतवाल) हे तलाठी कार्यालय तसेच वरिष्ठ महसूल कार्यालयात 24 तास तत्पर सेवा देत असतात. महसूल कामकाजासोबतच बिगर महसुली जबाबदाऱ्याही यशस्वीरित्या पार पाडत असून, या सर्व बाबीचा विचार करून कोतवाल या पदास शासकीय चतुर्थी राज्य शासनाने तात्काळ द्यावे अशी मागणी करणारे निवेदन महसुल सेवक (कोतवाल) संघटना उमरगा तालुका शाखा च्या वतीने तहसीलदार यांच्यामार्फत धाराशिव जिल्हाधिकारी यांना दि.19 सप्टेंबर रोजी देण्यात आले.

(कोतवाल) हे महसूल विभागाच्या कामकाजाचा एक अत्यावश्यक घटक आहे. महाराष्ट्र राज्यातील महसूल सेवक शासनाच्या विविध योजना, धोरणं आणि उपक्रमांचे यशस्वी अंमलबजावणी करण्यामध्ये कोतवालांची भूमिका अतिशय महत्त्वाची आहे. 

आजतागायत शासनाकडून कोतवाल पदास शासकीय वर्गीकृत कर्मचाऱ्यांचा (चतुर्थी श्रेणी) दर्जा देण्यात आलेला नाही. परिणामी, कोतवालांना शासकीय सेवा करत असतानाही अन्याय सहन करावा लागत आहे.

कोतवाल व आतचे महसुल सेवक हे पद ब्रिटिशकालीन असून त्यांचे सेवा-प्रवेश नियमांमध्ये नमूद ‌‘जबाबदाम्यां व्यतिरिक्तही, अतिरिक्त कामकाज ते पार पाडत आहे  उदा. निवडणुक विषयक, ई-पिक नोंदणी, नैसर्गीक आपत्तीमध्ये पंचनामा करण्यास सहाय्य करणे, महसुली वसुली गोळा करणे, वरिष्ठ कार्यालयात शिपाई, स्वच्छक, चौकीदार, संगणक चालक काही ठिकाणी तर महसुल सहाय्यकांचे कामकाज या सर्व जबाबदा-या बजावत असताना चतुर्थ श्रेणीचा दर्जा मिळणे हीच महसुल सेवक (कोतवाल) संघटनेची मुख्य मागणी असून, महसुल विभागात क्षेत्रीय स्तरावर 24 तास कार्यतत्पर असणार कर्मचारी उपेक्षीत आहे.याबाबीचा विचार करून महसुल सेवक (कोतवाल) यांना तात्काळ चतुर्थ श्रेणी कर्मचारी दर्जा देवून, त्यानुसार नियमित वेतनश्रेणी व सेवाशर्ती लागू कराव्यात अशी मागणी या निवेदना मार्फत करण्यात आली आहे.  निवेदनावर शिवशंकर मंडले,दिगंबर चव्हाण,प्रकाश शिंदे, बालाजी पांचाळ, कांबळे प्रमोद ,मुकेश गुरव ,मधुकर पाटील, कांबळे गौराबाई, कांबळे सुरेखा, दुरुगकर कुलभूषण आदींच्या स्वाक्षरी आहेत.

 
Top