तुळजापूर (प्रतिनिधी)- महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी मातेच्या शारदीय नवरात्र महोत्सव 2025 अंतर्गत “नऊ दिवस, नऊ रूप, नऊ अनुभव” या संकल्पनेवर आधारित विविध सांस्कृतिक, भक्तीमय व कलात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

कार्यक्रमांची रूपरेषा पुढीलप्रमाणे आहे. सोमवार 22 सप्टेंबर रोहित राऊत (इंडियन आयडॉल फेम) भक्तिसंगीत व ऑर्केस्ट्रा, मंगळवार 23 सप्टेंबर  पं. जयतीर्थ मेवुंडी  विशेष दर्शन व शास्त्रीय संगीत संध्या, बुधवार 24 सप्टेंबर  अभिजीत जाधव  लोकसंगीत मैफील, गुरुवार 25 सप्टेंबर  फोक लोक स्टुडिओ  लोकसंगीत मैफील, शुक्रवार 26 सप्टेंबर शाहीर रामानंद उगले लोकगीते मैफील, शनिवार 27 सप्टेंबर रसिकपर्ण डान्स अकॅडमी लोकनृत्य सादरीकरण, रविवार 28 सप्टेंबर  राणा जोगदंड  लोकसंगीत मैफील, सोमवार 29 सप्टेंबर  ड्रोन्‌‍ शो  300 ड्रोनद्वारे नवरात्र थीमवरील भव्य लाईट शो, मंगळवार 30 सप्टेंबर  फोक आख्यान  भव्य लोकसंगीत मैफील. या नवरात्र महोत्सवात भाविकांना भक्ती, संगीत, कला आणि संस्कृती यांचा अद्वितीय अनुभव लाभणार असून तुळजापूर नगरी पुन्हा एकदा भक्तिरसात न्हाऊन निघणार आहे.


 
Top