धाराशिव (प्रतिनिधी)- सामाजिक व साहित्य क्षेत्रातील भरीव योगदानाची दखल घेत अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेत धाराशिवचे साहित्यिक दिलीप परशुराम कांबळे यांची मराठवाडा प्रदेश सह सचिव म्हणून निवड करण्यात आली आहे. त्यांचा कार्यकाळ 31 डिसेंबर 2028 पर्यंत राहणार आहे.

शुभांगीताई काळभोर (राष्ट्रीय उपाध्यक्ष) व डॉ. शरद गोरे (राष्ट्रीय अध्यक्ष) यांच्या हस्ते ही निवड जाहीर करण्यात आली. परिषदेच्या वतीने कांबळे यांच्याकडून समाजातील सर्व घटकांपर्यंत साहित्य चळवळ पोहचवण्याची व समानतेचा संदेश रुजवण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. दिलीप कांबळे यांनी 1977 पासून लेखनास सुरुवात केली असून विविध नामांकित वृत्तपत्रांमध्ये त्यांचे लेख प्रकाशित झाले आहेत. तसेच अनेक प्रतिष्ठित दिवाळी अंकांमध्ये त्यांचे साहित्य झळकले आहे विशेषतः ग्रामीण कथालेखनात त्यांचा हातखंडा आहे. या निवडीमुळे मराठवाड्यातील साहित्यिक व सामाजिक वर्तुळात आनंद व्यक्त केला जात असून, कांबळे यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

 
Top