तेर (प्रतिनिधी)- धाराशिव तालुक्यातील तेर येथे जिल्हा परिषदेच्या माजी उपाध्यक्षा अर्चनाताई पाटील यांनी आढावा बैठक घेवून नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. बैठकीस नागरिकांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती लावून चांगला प्रतिसाद दिला.
यावेळी उपस्थित नागरिकांनी विशेषतः महिलांनी अनेक समस्या मांडल्या. यात प्रामुख्याने घरकुल, रस्ता ,निराधार व अपंग व्यक्तींचा मानधनचा प्रश्न, विकासकामे तसेच लाडकी बहीण व किसान सन्मान निधीच्या लाभातून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांच्या प्रश्नांचा समावेश होता. या प्रश्नांचे निराकरण करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना जिल्हा परिषदेच्या माजी उपाध्यक्षा अर्चनाताई पाटील यांनी सूचना केल्या.यावेळी भारतीय जनता पार्टीच्या महीला आघाडी जिल्हाध्यक्षा प्रिती कदम,उषा येरकळ,ॲड.दत्तात्रय देवळकर ,तेरच्या सरपंच दिदी काळे, उपसरपंच श्रीमंत फंड, माजी सरपंच नवनाथ नाईकवाडी , भास्कर माळी, मंगेश फंड,मज्जित मनियार,तलाठी प्रशांत देशमुख, कृषी सहाय्यक राम शिंदे, प्रभारी ग्रामविकास अधिकारी लाडे,प्रविण साळुंके,अजित कदम, शिवाजी चौगुले,गणेश फंड, दत्ता मगर ,नवनाथ पसारे, विवेकानंद नाईकवाडी,प्रतिक नाईकवाडी, अर्शाद मुलांनी,सोमनाथ फासे,महेश मुळे,रामा कोळी, किशोर काळे, संजय लोमटे, अमोल कस्तुरे ,अभिमान रसाळ, बिभीषण लोमटे,जहांगीर कोरबू, इर्शाद मुलांनी, तानाजी बंडे , जोशीला लोमटे,नसिम मुलांनी, मिरा जाधव, मुमताज तांबोळी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.