उमरगा (प्रतिनिधी)-  उमरगा तालुक्यातील शिक्षण विस्तार अधिकारी ज्ञानेश्वर जाधव यांच्या सेवानिवृत्ती निमित्त मान्यवरांच्याहस्ते सपत्नीक सत्कार शुक्रवार दि. 12 सप्टेंबर रोजी आईसाहेब मंगल कार्यालय उमरगा येथे करण्यात आला.   

कार्यक्रमाच्या सुरूवातीला प्रथमतः आई तुळजाभवानी,छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन आणि दीपप्रज्वलन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.यानंतर सर्व उपस्थित मान्यवरांचा यथोचित सत्कार करण्यात आला.    

कार्यक्रमाचे प्रास्तविक गुगळगाव केंद्राचे केंद्रप्रमुख प्रभाकर पांचाळ यांनी केले. कार्यक्रमाचे विशेष सत्कारमूर्ती सेवानिवृत्त शिक्षण विस्तार अधिकारी ज्ञानेश्वर जाधव यांचे मातोश्री नागरबाई बळीराम जाधव आणि त्यांचे सुवैद्य पत्नी सौ.सुलोचना ज्ञानेश्वर जाधव यांच्या कुटुंबियांना भावी आयुष्यासाठी आरोग्यमय शुभेच्छा देवून शैक्षणिक सेवेतील उल्लेखनीय कार्याबद्दल अल्पसा परिचय सांगितले.

यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष उमरगा पंचायत समितीचे माजी सभापती युवराज दाजी जाधव, प्रमुख उपस्थिती म्हणून उमरगा-लोहारा तालुक्याचे आमदार प्रविण स्वामी, दीपप्रज्वलनचे उद्घघाटक मराठवाडा निरीक्षक युवासेना किरणभैय्या गायकवाड, उमरगा तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी अमोल रजपूत, सेवानिवृत्त कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रदिप मोकाशे, तालुकाध्यक्ष शाहुराज चव्हाण, शिक्षण विस्तार अधिकारी शशिकांत कदम, दत्तात्रय जोशी, सेवानिवृत्त गट शिक्षण अधिकारी देविदास बनसोडे, उमरगा तालुक्यातील बारा केंद्राचे केंद्रप्रमुख शीला मुदगडे, सुशीलकुमार चोगुले, भरत चौधरी, अमोल थोरे, मोहन माने, अब्दूलकादर कोकळगावे, अशोक सुतार, लक्ष्मण बनसोडे, संतोष बोडरे, आबाराव कांबळे, गोपीचंद पवार, प्रभाकर पांचाळ, श्रीकांत जवळेकर, सेवानिवृत्त मुख्याध्यापक राजेंद्र पाटील, अशोक स्वामी, संजय चालुक्य, बालाजी दुधनाळे, केशव जाधव, उमरगा तालुका शिक्षक व सेवकाची सहकारी पतसंसथेचे चेअरमन, व्हा. चेअरमन, सचिव,संचालक,शिक्षण विभागातील कर्मचारी वृंद आणि सर्व शिक्षक संघटनेचे पदाधिकारी आदी विविध शाळांचे मुख्याध्यापक,शिक्षक बंधू-भगिंनी यांची उपस्थिती होती.

सेवापूर्ती सोहळ्यानिमित्त मान्यवरांच्या हस्ते सपत्नीक सत्कार केले. यानंतर कार्यक्रमावेळी मनोगत  महाराष्ट्र राज्य प्राथमिक संघाचे तालुकाध्यक्ष विजयकुमार ओवांडकर, पंजाबराव देशमुख शिक्षक संघटनेचे धाराशिव तालुकाध्यक्ष बळवंत घोगरे, सेवानिवृत्त कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रदिप मोकाशे, यानंतर प्रमुख उपस्थिती मराठवाडा निरीक्षक युवा सेना किरणभैय्या गायकवाड यांनी सेवानिवृत्त शिक्षण विस्तार अधिकारी ज्ञानेश्वर बळीराम जाधव यांच्या नौकरीपासून ते सेवानिवृत्तीपर्यंत जीवनातील विधायक कार्याची आठवण सामाजिक,संघटनात्मक, शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल शुभेच्छापर मनोगत व्यक्त केले.

यावेळी अध्यक्षीय समारोपात बोलताना उमरगा- लोहारा तालुक्याचे लोकप्रिय आमदार प्रविण स्वामी म्हणाले की, शिक्षक हा सुसंस्कृत समाज घडविणारा शिल्पकार आहे. त्यामुळे शिक्षकांनी आपले ज्ञान व अनुभवाचा उपयोग सातत्याने समाज हितासाठी केल्यामुळे स्वतःला आणि आपल्या कुटुंबाला समाधान मिळते.सेवापूर्ती सोहळा शिक्षण विस्तार अधिकारी सेवानिवृत्त ज्ञानेश्वर जाधव यांच्या सेवापूर्ती सोहळ्याप्रसंगी शुभेच्छापर मनोगत व्यक्त केले.

सेवापूर्ती सोहळा कार्यक्रमास डिग्गी, निलंगा, शहाजनी औराद, उमरगा परीसरातील जेष्ठ समाजप्रेमी शिक्षणप्रेमी समाज बांधव, मित्र मंडळी, राजकीय, शैक्षणिक, व्यवसायिक, सामाजिक, संघटनात्मक क्षेत्रातील मान्यवर, महिला भगिंनी, लहान-थोर मंडळी, सर्व शिक्षक वृंद,धाराशिव व लातूर जिल्ह्यातील स्नेही, नातेवाईक आदिची बहुसंख्येने उपस्थिती होती. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी राजेंद्र पाटील, डॉ. तुकाराम जाधव, परमेश्वर साखरे गुरूजी, गणेश भंडारे, वृशिकेत भंडारे, संदीप सुकनाळे, संदीप बिराजदार, नितेश बोरूळे, अंगद बिरादार, लक्ष्मण गणापूरे, ओमप्रकाश घंटे, विठ्ठल येवते, अभिषेक जाधव, चेतन जाधव,यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे सूत्रसंत्रसंचलन श्रीम. पुष्पलता पांढरे आणि सेवानिवृत्त शिक्षण विस्तार अधिकारी ज्ञानेश्वर जाधव यांनी सर्व उपस्थित स्नेहीजन यांचे मनःपूर्वक आभार मानले.

 
Top