तेर( प्रतिनिधी)- धाराशिव तालुक्यातील तेर येथील गावठाण व गायरानमध्ये अनेक वर्षे वास्तव्य करणाऱ्या नागरीकांना भोगवाटधारक प्रमाणपत्र वाटप करण्याची मागणी भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चा विभागाचे तेर विभाग प्रमुख सुनिल गायकवाड यांनी तेर ग्रामपंचायतकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की,तेर येथे अनेक वर्षांपासून अनेक नागरिक गावठाण व गायरान क्षेत्रात वास्तव्य करीत आहेत परंतु ग्रामपंचायत यांनी त्यांना भोगवाटाधारक प्रमाणपत्र दिलेले नाही त्यामुळे शासनाच्या विविध योजनेअंतर्गत मिळणारे घरकुल मिळण्यासाठी नागरीकांना आडचण निर्माण होत आहे.तरी तेर येथील जे नागरिक गावठाण व गायरान क्षेत्रात वास्तव्य करीत आहेत त्यांना भोगवाटाधारक प्रमाणपत्र देण्याची मागणी भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चा विभागाचे तेर विभाग प्रमुख सुनिल गायकवाड यांनी निवेदनाद्वारे तेर ग्रामपंचायतकडे केली आहे.