भूम (प्रतिनिधी)-  भूम शहरातील गोलाई चौक येथे श्री गणेशोत्सवानिमित्त श्री माऊलीच्या चालक -मालक तरुण गणेश मंडळाच्या वतीने दि. 4 सप्टेंबर रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरामध्ये 63 रक्तदान झाले. 

श्री कमला भवानी ब्लड बँक करमाळा यांच्या कर्मचाऱ्यांनी संपूर्ण रक्तदान प्रक्रियेची जबाबदारी घेतली होती. यावेळी ब्लड बँकेचे प्रिन्सेस शिंदे, निलेश पाटील, गणेश सपकाळ, संतोष यमकर, ओंकार आल्हार, आरजु शिकलकर, वैष्णवी घोडे, नितीन नाईकवाडी यावेळी अध्यक्ष विकास शेंडगे, बापू शेवकर, गोरख जाधव, बाळासाहेब आडसुळे, रोहित गीते, शिवशंकर वराडे, ज्ञानेश्वर केदारे, बापू रणदिवे, दीपक साळवे, महबूब पठाण, मनोज बारस्कर, बालाजी नाईकवाडी, पिनू मोरे, नितीन आकरे, आश्रुबा निरफळ, महादेव गायकवाड गणेश जरडकर, श्याम चौधरी, रमजान पठाण, यांच्यासह गणेश मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.

 
Top