भूम (प्रतिनिधी)-  गणेशोत्सवानिमित्त भूम शहरातील श्री चौंडेश्वरी तरुण व एकता मंडळाच्या वतीने महिलांसाठी होम मिनिस्टर खेळ पैठणीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. बुधवारी सायंकाळी सहा वाजता झालेल्या या कार्यक्रमात महिलांसाठी 51 आकर्षक बक्षिसांचे वितरण करण्यात आले. बक्षिसांमध्ये पैठणी, ड्रेसिंग टेबल, सोन्याची नथ, मिक्सर, कुक्कर, टेबल फॅन, हॅन्ड ज्यूसर आदी आकर्षक भेटवस्तूंचा समावेश होता.

कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण ठरल्या अँकर अपर्णा दळवी यांनी त्यांच्या सुरेख निवेदनाने उपस्थित महिलांना व पाहुण्यांना रंगवून ठेवले.  पुढील प्रमाणे विजेत्यांची नावे पहिला क्रमांक आरती दत्तात्रय बागडे (पैठणी), दुसरा क्रमांक किरण लक्ष्मीकांत बागडे (ड्रेसिंग टेबल), तिसरा क्रमांक  रेखा आण्णासाहेब काटे (सोन्याची नथ), चौथा क्रमांक गितांजली सुनिल बागडे (मिक्सर), पाचवा क्रमांक  वर्षा सागर बागडे (कुकर), सहावा क्रमांक प्रविणी विराज बागड (टेबल फॅन), सातवा क्रमांक  सोनाली प्रशांत भारती (हॅन्ड जुसर) असे या प्रकारे अनेक महिलांना बक्षीस वितरण करण्यात आले.

यावेळी मंडळाचे अध्यक्ष दत्ता वैद्य, उपाध्यक्ष नवनाथ रोकडे, माजी नगरसेवक सागर टकले, कोष्टी समाज अध्यक्ष विठ्ठल बागडे, दयाल फलके, राहुल उपरे, वैभव उपरे, मोहन बाबर, रोहित टकले, अतुल उपरे, योगेश असलकर महाराज आदी मान्यवर व पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

 
Top