धाराशिव (प्रतिनिधी) - येथील  मुक्तांगण प्रा. इंग्लिश स्कुल येथे दि. 19 व 20 सप्टेंबर 2025 रोजी दोन दिवसीय मोफत आरोग्य तपासणी शिबीर आयोजीत करण्यात आले होते.  

सतत होत असलेल्या वातावरणातील बदलामुळे लहान मुलामध्ये आजारी पडण्याचे प्रमाण वाढत आहे.  याच अनुषंगाने शाळेतील मुलाची आरोग्य तपासणी करण्यासाठी या शिबिराचे आयोजन करण्यात आले.  शहरातील बालरोग तज्ञ्‌‍ डॉ. निखिल मुसळे यांनी शाळेतील मुलांची मोफत आरोग्य तपासणी केली. मुलांनी व पालकांनी आरोग्याबाबत तसेच आहाराबाबत कोणती काळजी घ्यावी याविषयी मार्गदर्शन केले. या शिबिरामध्ये जवळपास 150 मुलांची आरोग्य तपासणी करण्यात आली. पालकांनी या आरोग्य तपासणी शिबिरास भरभरून प्रतिसाद दिला. सदरील आरोग्य शिबीर यशस्वी करण्यासाठी शाळेच्या संस्थापिका श्रीमती कमलताई नलावडे व शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.अर्चनाताई शितोळे यांनी मार्गदर्शन केले. तसेच शाळेतील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

 
Top