वाशी (प्रतिनिधी)- तालुक्यातील गोजवाडा ता.वाशी येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान योजनेअंतर्गत तालुकास्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी गट विकास अधिकारी ओंकार गायकवाड यांनी मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाविषयी मार्गदर्शन केले,गटविकास अधिकारी ओंकार गायकवाड यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, ग्रामीण भागात स्थानिक स्वराज्य संस्था महणून काम करणाऱ्या ग्रामपंचायती, पंचायत समित्या आणि जिल्हा परिषद यांना त्यांच्या कामगिरीनुसार प्रोत्साहीत करून त्यांची कार्यक्षमता वाढविण्यासाठी शासनाने ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज' अभियान हाती घेतले आहे. राज्यात 17 सप्टेंबर ते 31 डिसेंबर या कालावधीत हे अभियान राबविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्या अनुषंगाने धाराशिव जिल्हा परिषदेने कामकाजाचे नियोजन सुरू केले आहे. जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायती यांच्यामार्फत हे अभियान राबविले जाणार आहे. दरम्यान, तालुका स्तरावर प्रथम तीन क्रमांक पटकावणाऱ्या ग्रामपंचायतींना अनुक्रमे 15 लाख, 12 लाख आणि 8 लाख रुपयांचे बक्षीस दिले जाणार आहे. तर जिल्हास्तरावर प्रथम येणाऱ्या 3 ग्रामपंचायतींना अनुक्रमे रु.50 लाख, 30 लाख, 20 लाख, विभाग स्तरावरील प्रथम 3 क्रमांकांना अनुक्रमे रु. 1 कोटी 80 लाख आणि 60 लाख तर राज्यस्तरावर प्रथम 3 क्रमांक पटकावणाऱ्या ग्रामपंचायतींना अनुक्रमे रु 5 कोटी, 3 कोटी आणि 2 कोटी रुपये बक्षीस दिले जाणार आहे. लोकसहभाग हा या अभियानाचा मुख्य उद्देश असून लोकाभिमुख प्रशासन, नागरी सेवा-सुविधा केंद्रांना सेवा केंद्राचा दर्जा देणे, तक्रार निवारण, ग्रामपंचायत वेबसाईट, सीसीटीव्ही, दफ्तर व लेखे अद्ययावतीकरण, मतदार नागरिक ॲप डाउनलोड करणे, आयुष्यमान भारत कार्ड वितरित करणे, जिल्हा परिषद शाळेस हॅण्ड वॉश स्टेशन,सीसीटीव्ही,स्मशानभूमी कडे जाणारा रस्ता, पाणी पुरवठा, विजेची सोय,शौचालय,शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी करणे, कर आणि पाणीपट्टी 100 टक्के वसुली करणे, सर्व शासकीय संस्थांनी लोकसहभागासाठी प्रयत्न करणे, स्व-उत्पन्न वाढविणे, वॉटर बजेट, पिण्याचे शुद्ध पाणी पुरविणे, नळपाणी योजना, स्ट्रीटलाईट थकबाकी शुन्य करणे, पंतप्रधान आवासची कामे पुढे नेणे, महाराष्ट्र राज्य रोजगार हमी योजनाची कामे इत्यादींबाबतचे गुणांकन त्रयस्थ यंत्रणेमार्फत केले जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले यावेळी सहाय्यक गट विकास अधिकारी मोहन राऊत, सरपंच स्वाती आप्पासाहेब पाटील, तालुका आरोग्य अधिकारी महिंद्रकर साहेब, उमेद चे तालुका व्यवस्थापक राजकुमार ढाकणे, बालविकास प्रकल्प अधिकारी उर्मिला भारती मॅडम, गटशिक्षणाधिकारी सोमनाथ घोलप,पशुवैद्यकीय अधिकारी ज्ञानेश्वर बाबर, ग्राममहसुल आधिकारी सोमनाथ गायकवाड साहेब, जिल्हा परिषद शाळेचे मुख्याधापक संजीव घुले सर,ग्रामपंचायत अधिकारी भारत पारडे साहेब, उपसरपंच शिवाजी आण्णा मस्के ,पोलीस पाटील बिभीषण थोरबोले, माजी उपसभापती दत्तात्रय तोडकर, ग्रा. पं सदस्य विकास थोरबोले,ग्रा. पं सदस्य गणेश थोरबोले,अलका जाधव, मनीषा पंडित, ग्रा.पं.सदस्य निमा थोरबोले, ग्रा.पं.सदस्य, मंदाकिनी थोरबोले तसेच गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.