उमरगा (प्रतिनिधी)- रोटरी क्लब उमरगा व पोलीस स्टेशन उमरगा यांच्या संयुक्त विद्यमाने सी.पी.आर. ट्रेनिंग घेण्यात आली या कार्यक्रमासाठी क्लबचे अध्यक्ष डॉ. प्रा . धनंजय मेनकुदळे, सचिव प्रा. राजू जोशी उमरगा पोलीस स्टेशनचे पी.एस.आय. श्रीमान सूर्यवंशी, सी.पी.आर. ट्रेनिंग देण्यासाठी आलेले डॉक्टर निलेश महामुनी, डॉक्टर सुचेता पोफळे मॅडम, डॉक्टर शशी कानडे मॅडम,ऍन्स वंदना मेनकुदळे, शिवाजी कॉलेजचे प्राचार्य. डॉ.संजय अस्वले, रो. शिवकुमार दळवी, रो. संजीव कुलकर्णी, रो. प्रा. रवी आळंगे, रो . शिवानंदजी वदळगडे, रो. अजित गोबारे, रो. प्रशांत जी कुलकर्णी मालक, रो. सोमशंकर महाजन,रो. देवाप्पा सूर्यवंशी, रो. कमलाकरराव भोसले,व पोलीस स्टेशनचे 40 कर्मचारी यांना याचा लाभ घेता आला.डॉक्टर शैलेश महामुनी यांनी ट्रेनिंग देत असताना कोणकोणते काळजी घ्यायची याचे शास्त्रशुद्ध पद्धतीने विवेचन केले .त्यामुळे बऱ्याचशा काही चुका होत होत्या त्या चुकांचे निरसन या प्रशिक्षणाद्वारे मिळाले. प्रशिक्षणार्थी यांनी देखील आपल्या मनातील काही शंका होत्या त्या निरसन करण्याचे काम डॉक्टर शैलेश महामुनी सरांनी केले. पोलीस स्टेशनचे पीआय श्री सूर्यवंशी साहेबांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले व रोटरी क्लब चे आभार मानले.असा सुंदर आणि स्तुत्य उपक्रम आज पोलीस स्टेशन व रोटरी क्लबच्या वतीने घेण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक क्लबचे अध्यक्ष डॉक्टर मेनकुदळे यांनी केले. तर आभार सचिव राजू जोशी यांनी केले.

 
Top