उमरगा (प्रतिनिधी)-  उमरगा येथील आदर्श महाविद्यालयाची विद्यार्थिनी श्राविका कांबळे हिने जिल्हा युवा महोत्सवात शास्त्रीय व सुगम गायन स्पर्धेत अनुक्रमे द्वितीय व तृतीय पारितोषिक पटकावले आहे. चित्रपट अभिनेते योगेश शिरसाट, अभिनेत्री रूपलक्ष्मी चौगुले-शिंदे यांच्या हस्ते ट्रॉफी प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी माजी मंत्री मधुकरराव चव्हाण, संस्थेचे सचिव रामचंद्र आलूरे, जेष्ठ विधीज्ञ लक्ष्मीकांत पाटील, डॉ अंकुश कदम,प्राचार्य उमाकांत चनशेट्टी, डॉ कैलास अंबुरे आदींची उपस्थिती होती.

अणदूर येथील जवाहर कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालयात मंगळवारी या स्पर्धेचे बक्षीस वितरण करण्यात आले.डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर आणि जवाहर कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या वतीने घेण्यात आलेल्या जिल्हा युवा महोत्सवात भारतीय समूह गायन, व भारतीय शास्त्रीय गायन वैयक्तिक कला प्रकारात द्वितीय व तृतीय क्रमांकाचे पारितोषिक मिळविले आहे.महाविद्यालयाचें प्राचार्य डॉ राम सोलंकर, प्राचार्य डॉ श्रीराम पेठकर,प्रा डॉ लक्ष्मण बिराजदार,संगीत शिक्षिका गौरी कांबळे,प्रा शफी मुल्ला,डॉ सर्जेराव माळी,प्रा डॉ संजय दुलंगे,प्रा डॉ जब्बार मुल्ला,आदींनी अभिनंदन केले आहे.

 
Top