उमरगा (प्रतिनिधी)-  येथील नामाकिंत  जिल्हा परिषद शाळा व बहुजन हिताय विद्यार्थी वसतीगृहास ऑक्सीजन कॉन्स्ट्रेटर मशीन भेट देण्यात आली.

प्रथम एज्युकेशन फाउंडेशन मुंबई शाखा किल्लारी या संस्थेकडून  आय सी यू विभागात वापरली जाणारी ऑक्सीजन  मशीन उमरगा जि प शाळेचे मुख्याध्यापक पद्माकर मोरे व वसतीगृहाचे अधिक्षक प्रज्ञाजीत यांना प्रथम एज्युकेशन फाउंडेशन मुंबई शाखा किल्लारी येथील धाराशिवचे जिल्हा संपर्क अधिकारी सुमित कोथिंबीरे यांच्या हस्ते भेट देण्यात आली. यावेळी सामाजिक कार्यकर्ते नितेश राज दुर्वे, पत्रकार अमोल पाटील, मायक्रोकाम चे संचालक प्राध्यापक युसुफ मुल्ला व क्रीडा शिक्षक महंमद रफी शेख, पत्रकार गो. ल.कांबळे उपस्थित होते. यावेळी प्रशालेतील धनराज तेलंग, विद्यानंद सुत्रावे ,बशीर शेख, सदानंद कुंभार, संजय रूपाजी, प्रवीण शिंदे ,नागेश स्वामी, सोनाली मुसळे वर्षाराणी पाटील व इतर सर्व शिक्षक उपस्थित होते.

 
Top