तुळजापूर (प्रतिनिधी)- तालुक्यातील राखेल येथील नव्याने बांधण्यात आलेल्या स्मशानभूमीत वरचा स्लॅब न टाकल्याने अंत्यविधीच्या वेळी गंभीर समस्या निर्माण झाली.
नुकतेच गावातील एका पुरुषाचा अंत्यसंस्कार सुरू असताना अग्नी पेटविल्यानंतर अचानक पाऊस आला. यामुळे मृतदेहाची विटंबना झाल्याने अंत्यविधीसाठी आलेल्या नातेवाईक व बाहेरगावच्या उपस्थित मंडळींनी तीव्र नाराजी व्यक्त केली. राखेल स्मशानभूमीचे बांधकाम नुकतेच झालेले असूनही अपूर्ण ठेवण्यात आले.वरचा स्लॅब न टाकल्याने पावसाळ्यात अंत्यसंस्कार करताना मोठा अडथळा. मृतदेहाची विटंबना झाल्याने ग्रामस्थांतून संताप व्यक्त करण्यात आला. या प्रकरणाची चौकशी करून दोषी ठेकेदार व संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थ व नातेवाईकांनी गटविकास अधिकाऱ्यांकडे केली आहे.
“स्मशानभूमी हा गावातील अत्यंत संवेदनशील ठिकाण आहे. येथे दुर्लक्ष होणे म्हणजे भावनांशी खेळ आहे. दोषींवर कठोर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी ग्रामस्थांन मधुन होत आहे.
