तुळजापूर (प्रतिनिधी)- रविवार दि. 7 सप्टेंबर रोजी सांयकाळी चंद्रग्रहण असल्याने श्री तुळजाभवानी मंदिरात रविवार दि. 7 सप्टेंबर रोजीची सायंकाळ, रात्र व सोमवार दि. 8 सप्टेंबर रोजीची पहाटे चंद्रग्रहण असल्यामुळे श्री देविजींचे पुजा विधी खालील प्रमाणे होतील. 

 रविवार दि. 7 सप्टेंबर रोजीची सायंकाळ 06.30ते 7.30 घाट देणे, पुजेस हाक मारणे, पुजारी श्रीदेविजीजवळ येणे व निर्माल्य विसर्जन, श्री देविजींचे सायंकाळची सिंहासन पुजा, पंचामृत व शुद्धस्नान. 07.30 ते 08.00 श्री देविजींची आरती व धुपारती, 08.00 ते 8.30 श्री देविजींचा छबिना, 08.30 ते 09.30 जोगवा व प्रक्षाळनंतर देऊळ बंद करणे.  09.30 ते 09.45 चरणतिर्थ करणे. 09.45 ते 9.55 घाट देणे, पुजेस हाक मारणे, पुजारी श्रीदेविजीजवळ येणे व निर्माल्य विसर्जन, 09.57 चंद्रग्रहण कालावधी सुरु ते 01.30 चंद्रग्रहण कालावधी समाप्त. श्रीदेविजींना सोवळयात ठेवणे. 

सोमवार दि. 8 सप्टेंबर 01.30 ते 04.00 पंचामृत स्नान, शुध्द स्नान, आरती व धुपारती, सोमवार दि. 8 सप्टेंबर रोजी श्री देविजींची सकाळची नित्याची पुजा सकाळी 06.00 वाजता आरंभ होईल. दिनांक  7 सप्टेंबर 2025 रोजी श्रीदेविजींच्या सायंकाळच्या 02 सिंहासन पुजा व अभिषेक पुजा बंद राहील. अशी माहीती माया माने तहसीलदार तथा व्यवस्थापक (प्रशासन) श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान तुळजापूर यांनी दिली.

 
Top