भूम (प्रतिनिधी)-  मौजे कपिलापुरी.ता.परांडा येथे दिं.25 नोव्हेंबर 2024 रोजी मांतग समाजातील महिला पुरुषावर गावातील गांवगुंडानी विधानसभा निवडणुकीत विरोधात प्रचार का केलास म्हणून मारहाण करून जिवे मारण्याची धमकी देऊन जातीवाचक शिवीगाळ करण्यात आलेली होती. या प्रकरणातील सर्वोच्च न्यायालयात दिं.01 सप्टेंबर 2025 रोजी न्यायालयाने आरोपीचां अटक पूर्व जामीन अर्ज फेटाळून आरोपींना तत्काळ अटक करा. आदेश दिला असताना देखील आरोपींना अटक करण्यात आलेली नाही.

या प्रकरणात परांडा पोलिस स्टेशन मध्ये ॲट्रोसिटी ॲक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. परंतु आरोपींना अटक करण्यात आलेली नाही. आरोपी हे अटक पूर्व जामीन मिळावा याकरिता न्यायालयात अर्ज करत होते. 

सदर प्रकरणात न्यायालयाच्या आदेशाची तत्काळ अंमलबजावणी व्हावी. यासाठी भूम पोलीस उपअधीक्षक यांच्याकडे सकल मांतग समाजाच्या वतीने निवेदन देण्यात आले. या प्रकरणातील आरोपींना तत्काळ अटक न झाल्यास सकल मांतग समाजाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येणार आहे. यावेळी प्रदीप साठे, गुलाब शिंदे, विनोद थोरात, नितीन साठे, सचिन साठे, सोमनाथ बोडरे, यशवंत बोडरे, हरी लोंढे आदि उपस्थित होते.

 
Top