तुळजापूर (प्रतिनिधी)- जळकोट ते अणदूर या राष्ट्रीय महामार्गावरील मोठमोठे खड्डे व पावसाचे साचलेले पाणी यामुळे रस्त्याची अक्षरशः नाल्यासारखी अवस्था झाली आहे. या निकृष्ट कामास व गलथान कारभारास जबाबदार असलेल्या महामार्ग प्राधिकरण अधिकाऱ्यांना शिवसेना (उबाठा) पक्षाचे व जळकोटचे उपसरपंच प्रशांत नवगिरे यांनी सज्जड दम दिला. “रस्ता सुस्थितीत येईपर्यंत टोल वसुली बंद करा, अन्यथा टोलनाका उध्वस्त करू” असा इशारा त्यांनी दिला. या वेळी तालुका संघटक कृष्णात मोरे, राजेंद्र जाधव (मेजर), संतोश पुदाले, अनिल छत्रे, नेताजी महाबोले, दत्ता भोसले, नितीन राठोड, सूर्यकांत चव्हाण, धनंजय बिराजदार आदी उपस्थित होते.