कळंब (प्रतिनिधी)- हाजारो क्रांतिकारक यांनी बलीदान देऊन मराठवाडा मुक्त केला. म्हणून शासनाने मराठवाडा मुक्ती संग्राम दिन साजरा करण्याची सुरुवात केली. मराठवाड्यात 17 सप्टेंबर हा दिवस मराठवाडा मुक्ती संग्राम दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवशी स्वतंत्र कार्यालयाचा दर्जा असलेल्या कार्यालय ठिकाणी ध्वजारोहण करणे बंधनकारक आहे. परंतु बुधवार 17 सप्टेंबर रोजी, कळंब तालुक्यातील अनेक शासकीय कार्यालय येथे ध्वजारोहण करण्यात आले नाही. हि अतिशय गंभीर निष्काळजीपणा उघड होणारी फौजदारी पात्र बाब आहे.
कळंब तालुक्यातील खामसवाडी, वाकडी, आंदोरा येथील आरोग्य उपकेंद्र येथे ध्वजारोहण केले नाही. ध्वजारोहण करण्यासाठी लावण्यात आलेले लोखंडी पाईप रिकामेच असल्याचे निदर्शनास आले. हासेगाव, आंदोरा, मोहा, गोविंदपूर येथील तलाठी कार्यालय येथे ध्वजारोहण केले नाही. तलाठी कार्यालय येथे ध्वजारोहण करण्यासाठी लावण्यात आलेले लोखंडी पाईप रिकामेच असल्याचे निदर्शनास आले. कळंब येथील सामाजिक कार्यकर्ते राहुल मुळे यांनी या सर्व कार्यालयांचे फोटो सह पुरावे सादर करून उपविभागीय अधिकारी कळंब यांना संबंधित कार्यालय प्रमुख विरोधात गुन्हे दाखल करण्यात यावेत अशी तक्रार दाखल केली आहे.