धाराशिव (प्रतिनिधी)-  संस्थेचा एकूण निधी आणि भाग भांडवल पाहता प्रगती पतसंस्थेचे भांडवल पर्याप्तता प्रमाण (सीएआर) खूप उच्च पातळीचे रोखलेली आहे म्हणजेच संस्था मजबूत पायावर उभी असल्याचे दिसून येते माझ्या हातून नोंदणी झालेली या संस्थेचे रोपट्याचे आज वटवृक्षात रूपांतरीत होत आहे त्याचा निश्चित मला आनंद आणि अभिमान वाटतो असे सेवानिवृत्त जिल्हा उपनिबंधक यांनी प्रतिपादन केले. ते प्रगती सहकारी पतसंस्थेच्या 23 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. 

त्यावेळी सोलापूर जनता सहकारी बँकेचे अध्यक्ष सुनील पेंडसे,सोलापूर जनता संचालक ॲड अमोल कळसे माजी नगराध्यक्ष मकरंद राजे निंबाळकर माजी पंचायत समिती सभापती   बालाजी गावडे हे प्रमुख पाहुणे म्हणून मंचावर उपस्थित होते

पुढे बोलताना त्यांनी संस्थेचे अनेक वर्षाच्या अनुभवावर विचारपूर्वक कार्यक्षेत्र वाढ आणि शाखा विस्तार करण्याचा योग्य निर्णय घेतल्याचे सांगितले सोलापूर जनता बँकेचे अध्यक्ष सुनील पेंडसे यांनी संस्थेच्या वाटचालीबद्दल व कामकाजाबद्दल समाधान व्यक्त करून संस्थेच्या संचालक मंडळाचे कौतुक केले संस्थेच्या सभासदांना अर्थसाक्षर करण्यासाठी आणि एकूणच समाजात आर्थिक विषयावर अशी बचतीच्या पर्यायावर जागृती करण्यासाठी वेगवेगळ्या कार्यशाळा आणि व्याख्यानाचे आयोजन करावे असे सूचित केले संस्थेचे सचिव डॉ हर्षल डंबळ यांनी आपल्या प्रस्ताविकातून संस्थेच्या आतापर्यंतच्या वाटचालीचा आढावा घेतला त्याचप्रमाणे या पुढील काळातील संस्थेच्या नवीन योजना व संकल्पना सभासदांना विशद केल्या संस्थेच्या मुख्य कार्यालयाच्या इमारतीचे बांधकाम येत्या सहा महिन्यात पूर्ण करून त्यावेळी भव्य असा उद्घाटनाचा कार्यक्रम आयोजित करण्याचा मानस व्यक्त केला तसेच संस्थेने तालुका कार्यक्षेत्रात वाढ करून जिल्हा कार्यक्षेत्र केले असून भूम,परंडा,कळंब,लोहारा, तुळजापूर अशा सहा ठिकाणी शाखा विस्तारित केल्या असल्याचे सांगितले

संस्थेचे अध्यक्ष प्रशांत पाटील यांनी अहवाल वाचन करत असताना संस्थेच्या मागील आर्थिक वर्षातील प्रगती वरील वाटचालीचा लेखाजोखा सविस्तरपणे मांडला 31 मार्च 2025 अखेर संस्थेची सभासद संख्या 5458 असून 5 कोटी 26 लाख 78 हजार आहे आणि संस्थेने वेळोवेळी नफ्यातून तरतुदी करून मार्च अखेर संस्थेकडे 15 कोटी 12 लाख  96 हजार इतका निधी असल्याचे सांगितले मार्च अखेर संस्थेकडे एकूण 75 कोटी 80 लाख 3 हजार  इतक्या ठेवी असून संस्थेने स्वतःच्या ठेवी व भाग भांडवलातून गरजू सभासदांना 49 कोटी 98 लाख 77 हजार इतके कर्ज वाटप केले असल्याचे नमूद केले संस्थेला मागील आर्थिक वर्षात एक कोटी 75 लाख इतका नफा झाला असून संस्थेच्या सभासदांना 12% लाभांश देण्याची घोषणा केली तसेच संस्थेला ऑडिट वर्ग अ मिळाल्याचे सांगितले तेव्हा उपस्थित सभासदांनी टाळ्यांच्या गजरात स्वागत केले अध्यक्षीय वाचनात पुढे बोलताना त्यांनी संस्थेच्या वतीने पूरग्रस्तांना 2 लाख रुपयाची मदत देण्याचे जाहीर केले त्यावेळी संस्थेचे सभासद किशोर जाधव यांनी सर्व सभासदांना सांगितले की सर्व सभासदांनी पण स्वतः योगदान द्यावे असे सूचित केले तसेच संस्थेचे सभासद आणि चिलवडी गावच्या सरपंच सौ रोहिणी श्याम जाधव यांनी उत्स्फूर्तपणे त्यांना मिळणारे मानधन 3 हजार  रुपये पूरग्रस्तांना देण्याचे जाहीर केले

अहवाल वाचनानंतर सभासदाने विचारलेले प्रश्नांना संस्थेचे उपाध्यक्ष श्याम भैय्या जाधव यांनी सविस्तर असे उत्तरे दिली संस्थेच्या इमारत बांधकामासाठी आतापर्यंत झालेला खर्च आणि यापुढे होणाऱ्या खर्चाचा अंदाज त्यांनी मांडला तसेच दुसऱ्या एका प्रश्नाचे उत्तरात त्यांनी सहा तालुक्याच्या ठिकाणी शाखा विस्तारित केल्या असून त्या शाखा मध्ये आतापर्यंत झालेल्या उलाढारीचा सविस्तर आढावा मांडला तसेच सुधन गोल्ड बाबतच्या प्रश्नावर संस्थेचे अधिकारी वैभव जाधव यांनी सविस्तर उत्तर दिले त्यानंतर संस्थेचे सचिव डॉ हर्षल डंबळ यांची सोलापूर जनता सहकारी बँकेच्या संचालक पदावर निवड झाल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला

यावेळी धाराशिव सह सर्व सात शाखांच्या शाखाधिकाऱ्याचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मोहन सावंत यांनी केले तरी उपस्थित प्रमुख पाहुण्यांचा परिचय संस्थेचे संचालक शशिकांत वैराळे, नंदकुमार  भुतेकर, सुधाकर कुलकर्णी, रमाकांत घोडके, व्यंकटेश राजे, सविता थोरात यांनी परिचय करून दिला त्यावेळी सभासदांमध्ये नितीन दादा भोसले माजी नगरसेवक सिद्धार्थ बनसोडे धनंजय राऊत दर्शन कोळगे महादेव थोरात अग्निवेश शिंदे अविनाश यादव ॲड  डी डी मडके जयप्रकाश कोळगे मनोज पडवळ इत्यादी मान्यवर तसेच सभासद खातेदार हितचिंतक संस्थेचे सर्व कर्मचारी संक्षेप ठेव प्रतिनिधी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने करण्यात आली व आभार प्रदर्शन शाखाधिकारी हरि क्षीरसागर यांनी केले भोजनाने संस्थेची सांगता होऊन वार्षिक सर्वसाधारण सभा अत्यंत खेळीमेळीच्या आणि उत्साहाच्या वातावरणात संपन्न झाली


 
Top